Thursday, June 21, 2007

मेघांच्या उत्सवीं जाहलों उन्मन
दवांत तीर्थांचे घेतलें दर्शन
दूर क्षितिजाची निळी भुलावण
पाशांविण मला ठेवी खिळवून
अक्षयवीणाच घुमे माझ्या गात्री
आनंदयात्री मी आनंदयात्री

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: