Monday, June 30, 2008

देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी ।
तेणें मुक्ति चारी साधलिया ॥१॥

हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।
पुण्याची गणना कोण करीं ॥२॥

असोनि संसारीं जिव्हे वेग करीं ।
वेद-शास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥

ज्ञानदेवो म्हणे व्यासाचिये खुणे ।
द्वारकेचे राणे पांडवां घरीं ॥४॥

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: