Tuesday, July 8, 2008

जोहार मायबाप जोहार ।
तुमच्या महाराचा मी महार ॥१॥

बहु भुकेला झालो ।
तुमच्या उष्ट्यासाठी आलो ॥२॥

बहु केली आस ।
तुमच्या दासाचा मी दास ॥३॥

चोखा म्हणे पाटी ।
आणिली तुमच्या उष्ट्यासाठी ॥४॥

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

1 comment:

साधक said...

धन्यवाद. मी नेमके शब्द शोधत होतो. गुगल केलं. पटकन सापडलं. अनेक आभार.