गणराज रंगि नाचतो, नाचतो,
पायि घागऱ्या करिती रुणुझुणु
नाद स्वर्गि पोचतो !
कटि पीतांबर कसुन भर्जरी
बाल गजानन नर्तनासि करि
तुंदिल तनु तरि चपल साजिरी
लावण्ये साजतो !
नारद तुंबरु करिती गायन
करी शारदा वीणावादन
ब्रम्हा धरितो तालहि रंगुन
मृदंग धिमि वाजतो !
देवसभा घनदाट बैसली
नृत्यगायने मने हर्षली
गौरीसंगे स्वये सदशिव
शिशुकौतुक पाहतो !
[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]
No comments:
Post a Comment