Thursday, August 5, 2010

जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू .
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू .
पैलतीरा नेशील, साथ मला देशील, काळीज माझं तू .
सुख भरतीला आलं, नभ धरतीला आलं, पुनवंचा चांद तू .
जीव दंगला ...
चांद सुगंधा येईल, रात उसासा देईल, सारी धरती तुझी, रुजव्याची माती तू .
खुळं आभाळ ढगाळ, त्याला रूढीचा इटाळ, माझ्या लाख सजणा, ही काकणाची तोड माळ तू .
खूण काळीज हे माझं तुला दिलं मी आंदण,
तुझ्या पायावं माखेल माझ्या जन्माचं गोंदण .
जीव दंगला ...


[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: