लेण्याद्री डोंगरावरी नदीच्या तीरी गणाची स्वारी
तयाला गिरीजात्मज हे नाव
दगडामदी कोरलाय भक्ती भाव
जमती ईथं रंकासंगती राव
शिवनेरी गडावर जनम शिवाचा झाला हो जी जी
लेण्याद्री गणानं पाठी आशिर्वाद केला हो जी जी
पुत्रानं पित्याला जल्माचा परसाद दिला हि जी जी
किरपेनं गणाच्या शिवबा धावूनी आला हो जी जी
खडकात केलं खोदकाम दगडचं मंडपी खांब
वाघ सिंह हत्ती लयं मोठं दगडाचं भव्या मुखवटं
गणेश माझा पुत्र असावा ध्यास पार्वतीचा
अन गिरीजात्मज हा तिनं बनवला पुतळा मातीचा
दगड माती रूप देवाचं लेण्याद्रि जसा
[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]
No comments:
Post a Comment